नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्यकाने अवयवदानाचा संकल्प केला तर अनेक जणांना मृत्यूनंतर त्या अवयवांचा उपयोग होतो आणि अनेकांना नवीन जीवन मिळते अशा शब्दात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आजच्या अवयदान रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
चर्चेत नसणारा आणि जास्त प्रसिध्दी नसणारा विषय अवयव दान आहे. पण जीवनात त्याचे महत्व किती आहे हे समजून सांगतांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले आपल्या जिल्ह्यात काही जणांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रिन कॉडीडोअर करून त्यांचे अवयव गरजवंतांना पाठविले होते. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले. रुढी परंपरा विचारात घेण्याऐवजी सत्य जीवनात विचार करा आणि आपल्या मृत्यूनंतर सुध्दा आपले अवयव इतरांना कामी येतील यासाठी संकल्प घ्या असे आवाहन अभिजित राऊत यांनी केले. या रॅलीमध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे या सर्वांनी मिळून रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. या रॅलीत आरोग्य विभागातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेतली.