बिलोली (प्रतिनिधी) – बिलोली येथील मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय अनुदान निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बँकेतील कॅशिअर आणि शाखा व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल 2026 ते 16 मे 2026 या कालावधीत मध्यवर्ती सहकारी बँक, बिलोली येथे कार्यरत असलेले कॅशिअर प्रमोद भुजंगा इबितवार (वय 55, रा. नायगाव) आणि शाखा व्यवस्थापक दीपक देविदास देशमुख (वय 60, रा. देगलूर) यांनी संगनमत करून शासकीय अनुदान निधीतील 3 लाख 22 हजार 100 रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. आरोपींनी संबंधित रक्कम आरटीजीएसद्वारे स्वतःच्या एसबीआय खात्यावर वर्ग करून बँकेची तसेच सभासदांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत राजेश मारोतीराव पाटील (रा. कासराळी, ता. बिलोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 134/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 314, 316(2), 316(5), 318(4) आणि 3(5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 825 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत खुनाचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद व्यवसायात 20 टक्के भागीदारीचे आमिष; 30 लाखांची फसवणूक