नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिल्लतनगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ जून २०२६ रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी नवाज अहमद अब्दुल खदरो (वय ३५, रा. मिल्लतनगर गल्ली क्र. ११, नांदेड) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. यावेळी घरातील सोन्याच्या कानातील जुनी वापरती बाली (किंमत ४० हजार रुपये) तसेच २५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५७/२०२६ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार वाघमोरे हे करीत आहेत. परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 651 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दारूसाठी पैशांची मागणी फेटाळल्याने मारहाण; १६ हजारांचा ऐवज हिसकावला नात्याला काळिमा! हा माझ्यासारखा दिसत नाही या संशयापोटी ४ वर्षांच्या पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला जन्मठेप