नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीत एका वाहनातुन 17 लाख 35 हजार 375 रुपये रोख रक्कम पकडली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत पैशांची उलाढाल हा विषय सुध्दा मोठा आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पोलीस पथक अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. आज 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास बाफना टी.पॉईंट येथे एम.एच.12 यु.एम. 4216 ही बंद बॉडी असलेली गाडी इतवारा गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक विलास पवार यांनी या गाडीची तपासणी केली. या गाडीत 17 लाख 35 हजार 375 रुपये रोख रक्कम होती. या संदर्भाने विचारणा केली असता त्या रक्कमेबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तेंव्हा पोलीस विभागाने ही रक्कम आणि 10 लाख रुपयांची गाडी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केली आहे. घडलेल्या या घटनेबद्दल आणि सापडलेल्या रक्कमेबद्दलची माहिती एफएसटी, आयटी या विभागांना सुध्दा देण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे आदींनी आपल्या पोलीसांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,308 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वजिराबाद पोलीसांनी 96 धार-धार आणि घातक शस्त्रे पकडली Rybelsus: O Novo Aliado no Controle do Diabetes Tipo 2