नांदेड परिक्षेत्रातील गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक 1 ते 30 जून, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविण्याचे निश्चित केले आहे. याप्रमाणे परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेच्या चौथ्या दिवशी, गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध (6) गुन्हे नोंदवत, या व्यवसायात गुंतलेल्या एकूण (7) आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. मोहिमेअंतर्गत, परिक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात (3), परभणी जिल्ह्यात (2) तर लातूर जिल्ह्यात (1) अशा एकूण (6) कारवाया करण्यात आल्या असून, एकूण (7) आरोपींकडून 1,49,664/- रुपये किंमतीचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. पदार्थांच्या संदर्भात, संबंधिताविरुद्ध कलम 123 बी.एन.एस. अन्वये कारवाई करण्यात आली असून, सदर कारवाईचा खटला हा सत्र न्यायालयात चालणारा असून त्यास दहा वर्षेपर्यंतच्या कारावासासह द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे. पान टपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम : गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची पानटपऱ्यांवरून होणारी विक्री थांबविण्यासाठी पोलिसांनी पान टपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. काल दिवसभरात नांदेड परिक्षेत्रात एकूण (466) पान टपऱ्यांची तपासणी करण्यात आल्या असून, अंमली पदार्थांच्या साठवणुकीची संभाव्य ठिकाणे देखील तपासण्यात येत आहेत. खबर हेल्पलाइन वरून माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,120 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation काय करणार हे झुरळ उद्या जंतर मंतर वर महान मोदी आणि ट्रंप: लुटालुटीची एक जागतिक प्रेमकथा!