नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. नीलाभ रोहन यांनी बुधवारी सायंकाळी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. एका अत्यंत शुभ मुहूर्तावर, म्हणजेच सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी दशमी तिथी संपून एकादशी सुरू होत असताना, त्यांनी जिल्ह्याच्या सुरक्षेची धुरा आपल्या हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. नीलाभ रोहन यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली असून, त्यांनी सर्वप्रथम पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेतली आणि जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत चर्चा केली. विशेष म्हणजे, डॉ. रोहन आणि आयजी शहाजी उमाप यांचा परिचय जुना आहे. यापूर्वी डॉ. नीलाभ रोहन हे हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. हिंगोली हा जिल्हा नांदेड पोलीस परिक्षेत्रांतर्गत येत असल्याने आणि शहाजी उमाप हे या क्षेत्राचे प्रमुख असल्याने, या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यांच्या या जुन्या ओळखीचा आणि अनुभवाचा फायदा नांदेड जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बदली प्रक्रियेत मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची बदली झाली आहे. अविनाश कुमार यांनी २८ ऑगस्ट २०२४ पासून नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यापूर्वी त्यांनी एक वर्ष अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणूनही याच जिल्ह्यात सेवा बजावली होती. अशा प्रकारे त्यांचा नांदेडमधील एकूण कार्यकाळ सुमारे तीन वर्षांचा राहिला आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी पदभार स्वीकारताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. हिंगोलीतील त्यांच्या काही महिन्यांच्या यशस्वी कामगिरीनंतर आता नांदेड सारख्या मोठ्या आणि संवेदनशील जिल्ह्यामध्ये ते कशा प्रकारे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या नवीन जबाबदारीबद्दल आणि प्रवासासाठी त्यांना सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,224 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation व्यवसायात 20 टक्के भागीदारीचे आमिष; 30 लाखांची फसवणूक आ. रोहित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर; शेतकरी कर्जमाफी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार