दिव्यांग नेते राहुल साळवे यांना न्यायचक्र गौरव पुरस्कार जाहीर नांदेड प्रतिनिधी – लोक जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने दिला जाणारा न्यायचक्र गौरव पुरस्कार २०२६ नांदेड शहरातील विष्णुनगर येथील दिव्यांग नेते तथा पत्रकार राहुल साळवे यांना जाहीर करण्यात आला आहे. राहुल साळवे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार सितळे यांनी या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. येत्या २९ मार्च रोजी नांदेड शहरातील देवकृपा फंक्शन हॉल, छत्रपती चौक, पुर्णा रोड नांदेड येथे लोकजनशक्ती पार्टीचे खासदार अरुण भारती, प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे व संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार सितळे यांच्याहस्ते हा पुरस्कार राहुल साळवे यांना प्रदान करण्यात येणार आहे. गंगाधर गच्चे यांना पत्रकार न्यायचक्र पुरस्कार जाहीर पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून समाज हिताच्या साठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या अनेक मान्यवरांचा लोक जनजागृती संस्थेच्या वतीने मागील दहा वर्षापासून पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यावर्षी ही विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यावर्षी पत्रकार न्याय चक्र पुरस्कार जेष्ठ पत्रकार गंगाधर गच्चे यांना जाहीर झाला असून दिनांक 29 मार्च 2026 रोजी नांदेड शहरातील देवकृपा फंक्शन हॉलमध्ये लोकजनशक्ती पार्टीचे खासदार अरुण भारती प्रदेश अध्यक्ष प्रमोद कुदळे व संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार सितळे यांच्या हस्ते हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार गंगाधर गच्चे यांना प्रदान करण्यात येणार आहे. गंगाधर गच्चे यांनी आजवर अनेक नामावंत वर्तमानपत्रांमध्ये आपली लेखणी चालवून अनेक गोरगरीब सामान्य जनतेला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. या कार्याची दखल घेऊन लोक जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार सितळे यांनी त्यांना 2026 या वर्षाचा पत्रकार न्यायचक्र पुरस्कार नुकताच घोषित केला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे संपादक .ज्येष्ठ पत्रकार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 825 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जागतिक वन्य दिनानिमित्त ‘वन्यजीव संरक्षण ‘ चित्रफित प्रदर्शन गॅस सिलेंडरच्या वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल