नांदेड(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे उद्या, २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड येथे येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी दिली आहे. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी त्यांनी यापूर्वी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने केवळ आश्वासन दिले, मात्र त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे २९ जून रोजी ते पुन्हा आंदोलन करणार असून, याच पार्श्वभूमीवर त्यांचा हा नांदेड दौरा होत आहे. नांदेडला आगमन झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेतील. तसेच रात्री ८:३० वाजता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकांनंतर रात्री ९ वाजता ते सचखंड गुरूद्वारा येथे दर्शन घेतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २६ जून रोजी सकाळी, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला आमदार पवार अभिवादन करतील. या अभिवादन कार्यक्रमानंतर त्यांचा पुढील दौरा सुरू होईल. आमदार रोहित पवार यांच्या विविध बैठका आणि स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 725 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती; पदभार स्वीकारून कामाला केली सुरुवात लोकशाहीचा पराभव: जेव्हा मुख्यमंत्री जनतेलाच भाषण न देण्याची तंबी देतात