राष्ट्रीय एकता दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ नवीन नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शनिवार, दि.३१ ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशार सिंग साबळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा.कुलसचिव तुकाराम भुरके, सिस्टीम एक्सपर्ट शिवलिंग पाटील यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांसह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी उपस्थित सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राखण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात हा कार्यक्रम संपन्न झाला. Kanthak Suryatal Post Views: 24 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्राथमिक शिक्षक पदोन्नतीत याचिकाकर्त्यांना अखेर दिलासा; नांदेड जि. प. ची २८ शिक्षकांच्या पदोन्नतीची शिफारस