नांदेड- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या आदेशानुसार गटसाधन केंद्र पंचायत समिती लोहा यांच्या वतीने सेवेचे २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षक शिक्षिकांचे निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. विविध उद्दिष्टांच्या परिपुर्तीसाठी तिन्ही कुलांमधून कंधार व लोहा तालुक्यातील पात्र असलेले एकूण १५७ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष गंगाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरु आहे. पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकारी संतोष गंगाजी तसेच शिक्षण विस्तार आधिकारी सतीश व्यवहारे यांनी भेट देऊन संवाद साधला. यावेळी सुलभक डॉ. नागोराव जाधव, दत्तात्रय कांबळे, संभाजी वाघमारे, गंगाधर ढवळे, समीर शेख, धोंडीबा वाघमारे, रंगनाथ राठोड, तुकाराम मुंगरे, शेख फारुख, संजय अकोले, हावगीराव जामकर, बाळु चव्हाण तसेच तंत्रस्नेही शिक्षक विठ्ठल बरूरे, राजारुपे यांची उपस्थिती होती. दहा दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थींना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यांची माहिती, शिक्षण हक्क कायदा २००९, सर्वसमावेशक शिक्षण व विविध शासकीय योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहित करणे, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडानुसार शाळेचा गुणवत्तापूर्ण दर्जा सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे, अध्ययन – अध्यापन प्रक्रियेत एकात्मिक व सर्वसमावेशक पद्धतीसाठी कौशल्ये व भारतीय ज्ञान परंपरेद्वारे अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणे, शालेय प्रशासन, शालेय नियोजन व शालेय व्यवस्थापन या विषयांची अद्ययावत माहिती देण्याची प्रक्रिया यशस्वीपणे सुरू आहे. तसेच शालेय समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प, उपक्रम, कृतीसंशोधन यांचे महत्त्व विशद करणे, मूल्यमापनातील विविध पद्धती वापरून विद्यार्थ्यांच्या समग्र मूल्यमापनाची माहिती देणे, शालेय कामकाजात सुलभता व गतिमानता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व ऑनलाइन स्रोतांचा उपयोग करण्यास सक्षम करणे, प्रशिक्षणार्थ्यांच्या स्वतःच्या सर्वांगीण व्यावसायिक विकास साधण्यासाठी प्रोत्साहित करणे, विषयानिहाय गटचर्चेतून अध्ययन-अध्यापन मूल्यमापनातील समस्यांचे निराकरण करणे आदी उद्दिष्टांच्या परिपुर्ती करण्यासाठी दररोज सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत प्रशिक्षण सुरू आहे. यासाठी शिविअ विठ्ठल आचणे, सहनियंत्रक बी.टी केंद्रे, प्रशिक्षण समन्वयक म्हणून संजय अकोले नियोजन करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 219 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महात्मा ज्योतिराव फुले आणि केशवसुत यांच्या आधुनिक कवितांचा चिकित्सक अभ्यास : एक महत्त्वपूर्ण संशोधन