नांदेड (प्रतिनिधी) – वर्कशॉप कॉर्नर येथील एसबीआय एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तीन अनोळखी इसमांनी संगनमत करून फसवणूक केल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या दरम्यान फिर्यादी सुदर्शन दशरथ ऐनाळे (वय ७२, रा. सम्राळा, ता. धर्माबाद) हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे कार्ड वापरून वेगवेगळ्या एटीएममधून तब्बल २ लाख २३ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ४७५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२), ३१९(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि महाजन करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 628 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बनावट फोन कॉलद्वारे नांदेडच्या नागरिकाची २४.५० लाखांची फसवणूक नांदेडमध्ये चोरीच्या तीन घटना; २ लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास