नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील आनंदनगर परिसरातील एका ५२ वर्षीय नागरिकाची बनावट फोन कॉलद्वारे तब्बल २४ लाख ५० हजार ८१६ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपी प्रिया मेहरा, अमन गुप्ता, नवीन नारायणन आणि श्रीहास तांबे यांनी संगनमत केल्याचा आरोप आहे. आरोपींनी फिर्यादीला मोबाईल फोनवरून कॉल करून आपण बायोकॉन बायोलॉजिस्ट कंपनीचे को-ऑर्डिनेटर व एमडी तसेच सीईओ असल्याचे भासविले. त्यानंतर नोकरीचे आमिष दाखवून फिर्यादीकडून वेगवेगळ्या कारणांनी तब्बल २४ लाख ५० हजार ८१६ रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जितेंद्र गोविंदराव उत्तरवार (वय ५२, रा. आनंदनगर, नांदेड) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४) व ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशपांडे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 527 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये लब्बेक या रसूल अल्लाह लब्बेकचा गजर! शांतता आणि सलोख्याचे दर्शन घडवणारी भव्य ईद-ए-मिलाद मिरवणूक! एकता नगर परिसरात ३२ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; आई व भाऊही जखमी