नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस पथकाने बळीरामपूर येथील वडर गल्लीच्या बाजूला असलेल्या एका बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या तिरट नावाच्या अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून ३,१६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीवरून कारवाई दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, बळीरामपूर येथे बाभळीच्या झाडाखाली काही इसम बेकायदेशीररीत्या तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी पंचांसमक्ष धाड टाकून कारवाई केली व ५ जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपी १. गंगाराम कडाजी वाघमारे (वय ५२ वर्षे, रा. शाहू चौक, बळीरामपूर, नांदेड) २. बालाजी भीमराव चव्हाण (वय ५० वर्षे, रा. मधुबन शाळेजवळ, बळीरामपूर, नांदेड) ३. सचिन उत्तम पवळे (वय २९ वर्षे, रा. जानापुरी, ता. लोहा) ४. चिरंजीव संभाजी पाईकराव (वय ३३ वर्षे, रा. सिद्धार्थनगर, बळीरामपूर, नांदेड) ५. कृष्णा साईनाथ जाधव (वय २४ वर्षे, रा. वाडी, बळीरामपूर, नांदेड) जप्त केलेला मुद्देमाल ०४ मोटारसायकल: MH-26-CT-2410, MH-26-DC-4946, MH-26-DC-1075, MH-26-CW-1827 – अंदाजे किंमत २,८०,००० रुपये ०४ मोबाईल फोन: अंदाजे किंमत ३०,००० रुपये रोख रक्कम: ६,१०० रुपये आणि जुगाराचे साहित्य एकूण जप्त किंमत: ३,१६,१०० रुपये गुन्हा दाखल व पोलीस पथक या प्रकरणी नमूद आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४७६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव व पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि पोलीस अंमलदार खतारे, सदावर्ते, समीर अहेमद, आसिफ, टिक्करसे, गफार, कांबळे व माळगे (सर्व नेमणूक नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे) यांनी पार पाडली. पोलीस प्रशासनाचे आवाहन अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध पोलीस कारवाई सातत्याने सुरू असून नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेडचे जनसंपर्क अधिकारी आशिष सीताराम बोराटे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 528 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवघ्या २४ तासांत मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा छडा!