२५ व्या पुण्यतिथी निमित्त चित्रकलेच्या;प्रदर्शनातून धर्मवीर आनंद दिघेसाहेबाना आदरांजली…
ठाणे (प्रतिनिधी) – ठाणे जिल्ह्यातील कैवारी, अत्यंत प्रभावी आणि कट्टर हिंदुत्व व ध्येयवादी लोकप्रिय नेते समाजाला दिशा देणारे थोर समाजसुधारक मानवतावादी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आनंद चित्र कथा’ संपन्न होणार आहे. परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्राचे प्रदर्शन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे याचे आयोजन बारटक्के फाऊंडेशन आणि येवनेट मल्टिमीडिया प्रा.लि आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २५ ऑगस्ट २०२६ रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका, पाचपाखाडी ठाणे येथे वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० या दोन सत्रात होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनशीलता आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची, गुणांची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने इयत्ता के जी ते इयत्ता १० वी ते महाविद्यालय पर्यंत राज्यातील. तालुकयातील जिल्ह्यातील शहरातील शासकीय महानगर पालिका शाळा, खाजगी शाळा आणि इतर शाळां आणि कला महाविद्यालयातील तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘आनंद चित्रकथा’ संपन्न झाली आहे. चित्रकलेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख नव्या पिढीला घरो घरी आणि शाळा शाळात झाली आहे.
या कार्यक्रमात कला व उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व शंकर देसाई आणि अप्पा तथा चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे यांना हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे जीवनगौरव पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर किशोर नादावडेकर आणि प्रशांत सकपाळ यांना धर्मवीर श्री आनंद दिघे विशेष योगदान पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथि खासदार नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, पनवेल महापौर नितीन पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे,शिवसेना गट नेते पवन कदम, अध्यक्ष, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ दिलीप सपाटे,दि ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष अरुण पाटील,आदर्श विकास मंडळ अध्यक्ष सचिन मोरे आणि धर्मवीर चित्रपटाचे निर्माते अभिनेते मंगेश देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत मुख्य प्रवेशद्वाराजवळ जतन केलेली आठवण साहेबांची आर्माडा जीप गाडी महाराष्ट्र-०५- जी-२०१३ ठेवण्यात येणार आहे
चित्रकलेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि बारटक्के फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप बारटक्के यांनी केले आहे.
