नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस दलात पोलीसांची संख्या आजही कमीच आहे. परंतू त्यात लवकरच सुधारणा करून पोलीसांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे अपर पोलीस महासंचालक(प्रशासन) मधुकर पांडेय यांनी सांगितले. आज अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडेय हे तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. ते पोलीस अधिक्षक कार्यालयाची तपासणी करणार आहेत. आज त्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे आणि नांदेड शहर उपविभाग कार्यालयाची तपासणी केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी ते नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कवायतीचे निरिक्षण करणार आहेत. आज वास्तव न्युज लाईव्हशी बोलतांना अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडेय यांनी सांगितले की, पद्मनाभय्या समितीने सन 2000 मध्ये दिलेल्या अहवालानुसार पोलीसांची संख्या बरीच कमी आहे. पद्मनाभय्या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार 450 नागरीकांचा भार एका पोलीसांवर असावा. परंतू प्रत्यक्षात हा भार 650 वर आहे. महाराष्ट्राची आजची लोकसंख्या 12 कोटी 93 लाख आहे. म्हणजे 1 लाख लोकसंखेमागे 154 पोलीस आहेत. महाराष्ट्रात लागणारे पोलीस बळ 2 लाख 41 हजार 813 असे आहे. पण प्रत्यक्षात उपलब्ध पोलीस 1 लाख 98 हजार 870 आहेत. महाराष्ट्राच्या मंजुर संख्येप्रमाणे पोलीस भरती करण्यात आले तरी पद्मनाभय्या समितीच्या शिफारशीनुसार 45 हजार 233 पोलीस कमीच पडतील. 12 कोटी 93 लाख लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केला तर 2 लाख 87 हजार पोलीस लागतात. परंतू प्रत्यक्षात आहेत 1 लाख 78 हजार अर्थात 88 हजार पोलीस कमी पडत आहेत. या संबंधाने बोलतांना मधुकर पांडेय म्हणाले हा आकडा आज दिसत असला तरी लवकरात लवकर यात सुधारणा करू जेणे करून पोलीसांच्या कामामध्ये कोणताही ताण येणार नाही. पोलीसांच्या वास्तव्यासाठी असणाऱ्या घरांबद्दल बोलतांना मधुकर पांडेय म्हणाले की, आता पोलीसांसाठी नव्या घरांची संरचना करण्यात आली आहे आणि ती संरचना मागच्या घरांच्या मानाने जास्त मोठी आहे. सोबत त्यासाठी त्या घरामध्ये लागणाऱ्या सर्व पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे घरांचा प्रश्नही बऱ्याच प्रमाणात मार्गी लागणार आहे. या प्रसंगी नांदेडचे पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन सुध्दा उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 12 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भाग्यनगर पोलिसांकडून ४ आरोपींना अटक, ८.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस अंमलदाराने पोलीस महासंचालकांचे कर्ज मंजुर करून घेण्यासाठी पोलीसांकडून घेतले होते प्रत्येकी 2 लाख