शाळेतील कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; पोक्सो, विनयभंग आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील देगलूर येथील अंधविद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीच्या मृत्यूला विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा, विनयभंग तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनी विद्यालयात पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर देगलूरमधील डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेड आणि त्यानंतर लातूर येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूपूर्वी या विद्यार्थिनीने विद्यालयात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती आजीला दिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भातील कथित व्हिडिओ रेकॉर्डिंगही उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही, असा आरोपही वडिलांनी केला आहे. या आरोपांची सत्यता तपासाच्या माध्यमातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. पोलिसांनी सर्व संबंधितांचे जबाब, उपलब्ध व्हिडिओ, वैद्यकीय अहवाल, उपचाराची कागदपत्रे आणि विद्यालयातील नोंदी यांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणणे गरजेचे आहे. या घटनेने विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी संस्थांकडे विश्वासाने सोपवतात. त्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी प्रत्येक निवासी विद्यालयात नियमित सुरक्षा तपासणी, स्वतंत्र तक्रार यंत्रणा, सीसीटीव्हीची प्रभावी देखरेख आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. दोष सिद्ध होईपर्यंत कोणालाही आरोपी ठरवणे योग्य नाही; मात्र प्रत्येक आरोपाची निष्पक्ष, पारदर्शक आणि संवेदनशील चौकशी होणे हीच या घटनेतून समाजाची अपेक्षा आहे.तरी प्रकरणात आरोपी सदरात चंद्रशेखर कोकाटे,मारोती शिंदे, मुख्याध्यापक,संस्थाचालक नाव माहित नाही,अशोक काळे कर्मचारी कमलाबाई रामचंद्र कांबळे, कर्मचारी इतर स्टाफ, सर्व राहणार -अंध विद्यालय देगलूर ता.देगलूर जी.नांदेड अशी आहेत. Kanthak Suryatal Post Views: 822 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, ₹४.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त मोठी बातमी: सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने अमित शहांचे मिशन बंगाल धोक्यात? २० खासदारांची खासदारकी टांगणीला!