३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; कुंटूर पोलिसांची कारवाई नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांविरोधात नांदेड जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत कुंटूर पोलिसांनी सुजलेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंटूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि भोसले यांना सुजलेगाव शिवारात काही इसम पैशांवर ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी सापळा रचत छापा टाकला. या कारवाईत रवीराज उत्तम जुकरें (वय 27), सुनील माधवराव उचे (वय 25), साईराज रामकिशन कदम (वय 29), किशनराव तरकंटे (वय 33) यांच्यासह आणखी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून रोख २१ हजार ७०० रुपये, दोन मोटारसायकली, विविध कंपन्यांचे चार मोबाईल फोन (किंमत ७२ हजार रुपये) तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०३/२०२६, कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भोसले यांच्या नेतृत्वात पोहेकॉ कंधारे, पवार, पोकॉ स्वप्निल हंबर्डे व कुंटूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान, परिसरात जुगार, मटका, अवैध दारू, अमली पदार्थ, शस्त्रांची बेकायदेशीर वाहतूक किंवा अन्य कोणताही अवैध प्रकार सुरू असल्यास नागरिकांनी तत्काळ डायल ११२ अथवा नांदेड पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे Kanthak Suryatal Post Views: 281 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात 361 गुन्हे दाखल, 4 कोटींचा मुद्देमाल हस्तगत माहूरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास