नांदेड (प्रतिनिधी) – दिनांक 01 ते 31 ऑगस्ट, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका – जुगार, अवैध दारु विक्री, शस्त्र अधिनियम व इतर कलमांन्वये अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -2 राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत, दिनांक 01 ते 07 ऑगस्ट, 2026 दरम्यान संपलेल्या पहिल्या आठवड्यात, नांदेड परिक्षेत्रात, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत (9), महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (76), महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये (212), शस्त्र अधिनियमान्वये (14), तर इतर अधिनियमांखाली (50), अशा एकूण (361) कारवाया करुन (512) इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 4,03,71,916/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिक्षेत्रातील विविध घटकांनी या संदर्भात केलेली कारवाई पुढील प्रमाणे : जिल्हा गुटखा मटका/जुगार दारु शस्त्र अधिनियम इतर केसेस गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या नांदेड 6 1,52.688 9 23 11,92,940 94 59 2,49,060 62 5 10,01,000 11 22 2,73,37,955 40 परभणी 0 0 0 17 3,53,350 30 48 58,920 48 2 10,31,500 3 7 42,58,675 10 हिंगोली 1 87,200 1 9 46,390 15 57 69,490 57 4 22,200 4 11 12,17,760 11 लातूर 2 1,28,218 2 27 6,10,910 47 48 53,930 48 3 2,01,500 5 10 22,98,230 15 एकुण 9 3,68,106 12 76 22,03,590 186 212 4,31,400 215 14 22,56,200 23 50 3,51,12,620 76 खबर हेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 465 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेडात उद्या महामोर्चा आईचा खून अन् मुलाची आत्महत्या: राहुल कॉलनीतील त्या बंद दरवाजामागील भीषण वास्तव! एकच दिवसात तिसरा खून