माहूर (प्रतिनिधी)- माहूर तालुक्यातील पांढुदा येथे घराच्या दरवाजाची कडी कोंडा काढून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. पांढुदा, ता. माहूर येथील फिर्यादी एकनाथ रामराव डाळके (वय ३२) यांच्या घराच्या दरवाजाची कडी कोंडा काढून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने व नगदी रक्कम असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून श्रीकांत सुभाष तोडकरे ऊर्फ गोव्या (वय ३०, रा. पांढुदा, ता. माहूर) याच्याविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४७/२०२६, कलम ३०५, ३३१(३) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 671 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सुजलेगाव शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जणांवर गुन्हा बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटधारकाची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा