नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण हद्दीत घरफोडीची, तर भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरीची घटना घडली. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मिल्लतनगर येथे घरफोडी : दिनांक २ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते ३ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजेदरम्यान मिल्लतनगर, नांदेड येथील फिर्यादीच्या वडिलांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी रफिक दावल पठाण (वय ३९) यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मुंडे करीत आहेत. मंदिरातील दानपेटी फोडली : भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकदरा, नांदेड येथील खंडोबा मंदिरात ६ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते ७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील ११ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी ज्ञानोबा गंगाधर डोके (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनावणे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 766 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation काही तासातच नांदेड पुन्हा हादरले! सिडकोतील दूध डेअरीजवळ युवकाची निर्घृण हत्या! गुप्तधनासाठी मुलींचा नरबळी? विवाहितेच्या तक्रारीने खळबळ