नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या चिंतेत भर टाकली आहे. आज सकाळच्या खूनाच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच दुपारपर्यंत आणखी एका युवकाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडको परिसरातील दूध डेअरीजवळ,धनेगावकर पेट्रोल पंपावर दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींनी एका युवकावर शस्त्रांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात चंदन सिंग बावरी या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोर किती होते? त्यांनी कोणत्या शस्त्रांचा वापर केला? हल्ल्यामागे नेमके कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांकडून हा प्रकार गँगवॉरचा भाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हल्लेखोरांचा कोणत्या टोळीशी संबंध आहे का, याबाबतही वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र या दाव्यांना अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, एकाच दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत दोन खूनाच्या घटना चर्चेत आल्याने नांदेडच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. चंदन सिंह बावरी यांच्या हत्येमागील खरे कारण काय? हल्लेखोर कोण? हा पूर्ववैमनस्याचा प्रकार आहे की गँगवॉर? याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन सुद्धा घटनास्थळावर पोहचले आहेत.नांदेड ग्रामीण पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहे. महत्त्वाचे : या घटनेबाबत सोशल मीडियावर अफवा किंवा अपुष्ट माहिती पसरवू नये. पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल.नांदेडमध्ये वाढत्या हिंसक घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! Kanthak Suryatal Post Views: 3,277 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ब्रह्मांडीय प्रामाणिकपणाचा मुखवटा आणि भ्रष्टाचाराची नवी फाईव्ह स्टार संस्कृती! दिल्लीच्या तख्ताला दक्षिणेचा दणका! थलपती विजय आणि राहुल गांधींच्या जोडीने मोदी-शाहंचा परिसीमन प्लॅन रोखला?