नांदेड – राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि क्षमता उंचावण्यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2026-27 ही योजना राबविण्यात येत आहे. परदेश अभ्यास दौऱ्याकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी आपले अर्ज व प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधून सादर करावेत. शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर/शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबीची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी कृषी विभागाकडून राज्य पुरस्कृत योजना 2026-27 राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 5 शेतकऱ्यांची निवड होणार असून यात महिला शेतकरी 1, केंद्र, राज्य कृषि पुरस्कार प्राप्त / पिकस्पर्धा विजेता शेतकरी 1, इतर सर्वसाधारण शेतकरी 3 याप्रमाणे एकुण 5 लक्षांक आहे. नांदेड तालुक्यातील जास्तीत जास्त इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधून आपल्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, तालुक्यातील शेतक-यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे अवाहन तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा Kanthak Suryatal Post Views: 454 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अमित शाह संसदेत आहेत, पण सभागृहात का नाही? २जी जोडगोळीत नेमकी अडचण कुठे? आम्हाला आमचे न्यायाधीश कोण आहेत हे जाणून घेण्याचा अधिकार आहे! – सुप्रीम कोर्टातच उठला बंडाचा आवाज