नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी व चोरीच्या तीन स्वतंत्र घटना घडल्या असून, या प्रकरणांमध्ये रोख रक्कम, दागिने, मोबाईल आणि तांब्याची केबल असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे. नायगाव शहरातील हेडगेवार चौक परिसरात २ ऑगस्ट रोजी रात्री बंगळुरू बेकरीमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या एका आरोपीने स्वच्छता नसल्याच्या कारणावरून वाद घालत बेकरी चालकाला मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करत त्यांच्या शर्टच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मोहम्मद रफीक कुटेशी यांच्या फिर्यादीवरून रितेश रवींद्र कल्याण याच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर येथे घडली. सात जणांनी संगनमत करून एका महिलेला घरी बोलावून मारहाण केली. अंगावरील कपडे फाडून फोटो काढण्याची धमकी देत तिच्याकडील ५०० रुपये, ५ हजार रुपयांचा मोबाईल, सुमारे ८५ हजार रुपयांची सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच तिच्या ओळखीच्या व्यक्तीचा ५१ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची तक्रार आहे. याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भोकर तालुक्यातील जांभळी शिवारातील सोलार कंपनीमधून २६ जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३,५०० मीटर डी.सी. कॉपर तांब्याची केबल चोरी केली. चोरीस गेलेल्या केबलची किंमत ६० हजार ४०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 765 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तामसा-लिंबगावात फसवणुकीचा डाव; दोन गुन्ह्यांत साडेसात लाखांहून अधिक रकमेचा गंडा बसवेश्वर चौकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; धर्माबादमध्ये दुकानफोडी, ४३ हजारांचा ऐवज लंपास