नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात साखळी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार तिघांनी हिसकावून नेले, तर धर्माबाद येथे दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, कॅमेरा व इतर साहित्य असा एकूण ४३ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसवेश्वर चौक परिसरात ४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चित्राबाई कैलासचंद पाटणी (वय ६५, रा. वाडी बुद्रुक, नांदेड) या रस्त्याने जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक पोउपनि वाडेवाले अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, धर्माबाद शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरात ४ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील रोकड, कॅमेरा व इतर साहित्य असा ४३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी इम्रानखान बिस्मिल्ला खान (वय ४४, रा. शिवाजी नगर, धर्माबाद) यांच्या तक्रारीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार कुमरे तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 852 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मराठी भाषा संवर्धनासाठी शासनाचे व्यापक उपक्रम ;नांदेडमध्ये साहित्यिकांशी मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संवाद शेख शमीम हत्या प्रकरणाला नवे वळण: मुख्य सूत्रधार मिर्झा शब्बर बेगवर मकोका अंतर्गत कारवाई; ६ दिवसांची पोलीस कोठडी