नांदेड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील तामसा आणि लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून, या दोन्ही प्रकरणांत नागरिकांची एकूण सुमारे ७ लाख ८७ हजार ९५८ रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तामसा येथील प्रकरणात, ३ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत पीयूष सोमानी, रविकपूर, दिशा अग्रवाल, रिचा मिश्रा, गीता बॅनर्जी व अंकिता राणे (सर्व रा. तामसा) यांनी संगनमत करून फिर्यादीला एसबीआय पॉलिसी बंद करणे, रक्कम परत मिळवून देणे, कस्टमर आयडी, इन्शुरन्स खाते सुरू करणे तसेच सर्व्हिस टॅक्स भरणे आदी कारणे सांगून ५ लाख ३६ हजार ४३८ रुपये भरायला लावले. मात्र, कोणतीही रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर, तामसा येथील मोनिका राजेंद्रसिंह कच्छवेठेकर (वय २६) यांच्या फिर्यादीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत सपे करीत आहेत. दरम्यान, लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साई श्रद्धा हिंदुस्थान पेट्रोल पंप, सुगाव (बु.) येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी २०० लिटर पेट्रोल व २०० लिटर डिझेल, असा एकूण २ लाख ५१ हजार ५२० रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हिरालाल शर्मा, शिवराज स्वामी व परमेश्वर (रा. वाघी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्रद्धा दिपकसिंह रावत (वय ४७, रा. गाडीपुरा, नांदेड) यांच्या तक्रारीवरून लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 876 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation चोरट्यांचा पुन्हा हैदोस; जयभीमनगरातील घर फोडून ५७ हजारांचा ऐवज गायब जिल्ह्यात जबरी चोरी व चोरीच्या तीन घटना; लाखो रुपयांचा ऐवज लंपास