नांदेड (प्रतिनिधी) – भोकर शहरातील सुधा नदीच्या काठावर २१ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गंगाधर जिंके (वय २१, रा. अशोक कॉलनी, भोकर) याचा १ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सुधा नदीच्या काठावर मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्याचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोलीस नाईक सागर सुभाष झाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. या गंभीर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. नांदेडमध्ये जुन्या वादातून दोघांकडून जीवघेणा हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन भावांनी मिळून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नांदेड शहरातील अमन कॉलनी परिसरात घडली. या हल्ल्यात दरवाजा व दुचाकीचेही नुकसान करण्यात आले असून विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अमन कॉलनी येथे शेख दस्तगीर शेख महेबूब (वय ३५) व शेख शकील शेख महेबूब (वय २५) यांनी संगनमत करून फिर्यादी, त्यांचा भाऊ व नातेवाईक यांच्यावर जुन्या वादातून चाकू, विटा आदींच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात जखमींना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच घराच्या दरवाज्याचे व मोटारसायकलीचे नुकसान करून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मोहम्मद रेहान अली जरीर (वय ३६, रा. अमन कॉलनी, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 900 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी किनवट येथे अवैध विदेशी दारूसह मोटारसायकल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल