नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस दलाने केलेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे (इतवारा उपविभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे,पोलीस अंमलदार वसंत केंद्रे,धम्मपाल कांबळे,सचिन चावरे,शंकर माळगे यांनी सहभाग घेतला. या कार्यवाहीत नदीतून वाळू उपसा करणारे ५ इंजिन,३० तराफे,३० ब्रास वाळू आणि फायबरची एक मोठी बोट असा ५१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काही साहित्य तेथेच जाळून टाकण्यात आले आहे. या संबंधाचा गुन्हा मात्र २ अज्ञात आरोपीतांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 784 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठा छापा; 76.50 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड मध्ये रामराज्य! आयपीएल संपलं, पण सट्टेबाजांचा एकही धागा सापडला नाही ?