पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 जुलै, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी मोहिम उघडली आहे. सदर मोहिमे अंतर्गत, दिनांक 01 ते 15 जुलै, 2026 दरम्यान संपलेल्या पंधरवाडयात, नांदेड परिक्षेत्रात, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत (27), महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (132), महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये (575), शस्त्र अधिनियमाअन्वये (24), तर इतर अधिनियमाखाली (95), अशा एकूण (853) कारवाया करुन (1114) इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 10,18,64,967/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिक्षेत्रातील विविध घटकांनी अवैध व्यवसाय निर्मुलन मोहिमेमध्ये केलेल्या कारवाया पुढील प्रमाणे : जिल्हा गुटखा मटका/जुगार दारु शस्त्र अधिनियम इतर केसेस गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या नांदेड 19 50,89,290 31 37 25,48,690 141 130 17,24,549 139 11 83,750 18 32 6,57,28,551 56 परभणी 0 0 0 29 2,07,110 45 199 3,88,160 200 4 54,500 5 11 45,04,858 20 हिंगोली 1 2,09,200 2 19 3,82,855 54 114 1,92,315 114 4 22,500 4 31 1,07,99,525 36 लातूर 7 28,84,371 8 47 27,41,340 79 132 2,93,386 132 5 2,19,800 5 21 37,90,217 25 एकुण 27 81,82,861 41 132 58,79,995 319 575 25,98,410 585 24 3,80,550 32 95 8,48,23,151 137 परिक्षेत्रात सुरू असलेली अवैध व्यवसाय विशेष मोहीम ही पुढील पंधरावड्यात आणखी व्यापकपणे राबविण्यात येणार आहे. खबर हेल्पलाइन ला वाढता प्रतिसाद : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिक अवैध व्यवसायांची अचूक माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवत आहेत. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे व इतर अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी व आपल्या भागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,127 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation न्यायदेवतेच्या दरबारात विकेट डाऊन: बिलोलीच्या न्यायाधीशांना अखेर घरचा रस्ता! जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला अपयशी; ११ जागा निर्विरोध, उर्वरित १२ जागांसाठी २६ उमेदवार मैदानात