नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत पाच आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून तब्बल ७२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने २७ जून रोजी गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई केली. यावेळी एमएच-२८ आर-७८०० क्रमांकाचा हायवा अवैध रेती वाहतूक करताना पकडण्यात आला. तसेच गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणारी बोट, इंजिन व तराफाही जप्त करण्यात आला. या प्रकरणी समाधान बाबाराव जाधव (रा. गोवर्धनघाट, नांदेड), अधिनाथ मोरे व तुकाराम मोरे (दोघे रा. भनगी, अनेगाव) यांच्यासह एकूण पाच आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमासह संबंधित कलमान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान हायवा, बोट, इंजिन, तराफा आदींसह एकूण ७२.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व नांदेड ग्रामीण पोलीस पथकाने केली. पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन, वाहतूक तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 658 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन पल्स पोलिओ लसीकरण मोहीम भोकर येथे संपन्न