अधार्पूर (प्रतिनिधी) – येथील कामठा (बु.) गावात भीषण खूनाची घटना उघडकीस आली आहे. दिनांक १९ मे २०२६ रोजी पहाटे २ ते ५ या वेळेत प्रल्हाद राजाराम कल्याणकर (वय ४५) यांची अज्ञात आरोपीने निर्घृजपणे हत्या केली. मयताच्या तोंडावर व कानाजवळ गंभीर दुखापत करून हा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी मयताच्या पत्नी दोपदाबाई प्रल्हाद कल्याणकर (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अधार्पूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५३/२०२६ नोंदविला. भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम १०३(१) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून काही तासांतच आरोपीला अटक केली. आरोपी हा देखील त्याच गावातील असल्याची माहिती आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर खून अनैतिक संबंधातून झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. मयत प्रल्हाद राजाराम कल्याणकर यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी, संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक क-हाळे करीत आहेत. या घटनेमुळे कामठा (बु.) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना कायद्याची हाती न घेता घटनेची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. सदर खुनाचा तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,422 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिवाजीनगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी नांदेड ग्रामीण हद्दीत वाळूचा टिपर पकडला सहायक पोलीस अधीक्षकांनी अवैध वाळू वाहतुकीतील तीन टिप्परसह 1 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त