मुंबई (प्रतिनिधी)-बॉम्बे उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक स्वप्नील खाटी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यभरातील 239 जिल्हा न्यायाधीश, 337 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि 326 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अशा 902 न्यायाधीशांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील काही न्यायाधीशांचाही समावेश आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदावरील अनेक अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी बदली देण्यात आली असून काहींना पदोन्नतीनंतर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. नांदेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदावर कार्यरत असलेले काही अधिकारी नागपूर, औरंगाबाद, ठाणे, पुणे आणि इतर जिल्ह्यांत बदलीने नियुक्त करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने सर्व बदली झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना न्यायालयीन सुट्टीदरम्यान कार्यभार सोडून नव्या ठिकाणी ८ जून २०२६ रोजी न्यायालये सुरू होण्यापूर्वी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या प्रकरणांमध्ये सुनावणी पूर्ण झाली आहे, त्या प्रकरणांचे निकाल देऊनच कार्यभार सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, बदली आदेशांवर केलेल्या सर्व प्रतिनिधित्वांचा विचार करण्यात आल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायिक कामकाज अधिक कार्यक्षम आणि संतुलित करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या; नांदेड जिल्ह्यातील न्यायालयांनाही फटका मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग पदावरील न्यायिक अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील अनेक न्यायालयांचा समावेश असून काही अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे, तर काही अधिकारी नांदेडमध्ये रुजू होणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या यादीत नांदेड येथील २रे संयुक्त दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) न्यायालयातील सौ. एम.एम. बडे यांची बदली ४थे संयुक्त दिवाणी न्यायाधीश, नांदेड येथे करण्यात आली आहे. तसेच ३रे संयुक्त दिवाणी न्यायाधीश, नांदेड येथील श्री. क्यू.आर. सय्यद यांची बदली द्वितीय संयुक्त दिवाणी न्यायाधीश, कामठी (नागपूर) येथे झाली आहे. याशिवाय नांदेड येथील संयुक्त दिवाणी न्यायाधीश श्री. एम.जे. शेख यांची नियुक्ती २रे संयुक्त दिवाणी न्यायाधीश, नांदेड येथे करण्यात आली असून, सौ. एम.पी. राठोड यांची बदली ३रे संयुक्त दिवाणी न्यायाधीश, नांदेड येथे करण्यात आली आहे. दरम्यान, ४थे संयुक्त दिवाणी न्यायाधीश, नांदेड येथील श्री. एम.आर. कायस्था, ५वे संयुक्त दिवाणी न्यायाधीश, नांदेड येथील सौ. पी.ए. खंदारे आणि ७वे संयुक्त दिवाणी न्यायाधीश, नांदेड येथील श्री. व्ही.आय. घोरपडे यांच्याही बदल्या जाहीर झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, बिलोली आणि नायगाव-बाजार न्यायालयांमध्येही नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या या बदल्यांमुळे राज्यातील न्यायालयीन प्रशासनात फेरबदल होणार असून, संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजित तारखेनुसार नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय; नांदेड, हिंगोली, बीडसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील संयुक्त दिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. करवे डी.डी. यांची बदली नाशिक येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी श्री. चौहान बी.बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नांदेडचे मुख्य न्यायिक दंडाधिकारी श्री. नागरगोजे आर.यू. यांच्या जागी श्री. मोहोड एम.जे. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिलोली येथील दिवाणी न्यायाधीश पदावरही नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातही बदल्या करण्यात आल्या असून मुख्य न्यायिक दंडाधिकारी पदावर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड, चंद्रपूर, औरंगाबाद, अहमदनगर आणि नागपूर जिल्ह्यांतील विविध न्यायालयांमध्ये अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी व वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायाधीशांची मोठ्या प्रमाणावर बदली करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे न्यायालयीन प्रशासनात व्यापक फेरबदल होणार असून संबंधित अधिकाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयीन कामकाज अधिक प्रभावी आणि संतुलित करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाने जारी केलेल्या 902 न्यायाधिशांच्या बदल्या संदर्भाच्या तिन संचिका जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी या अनुक्रमाने वाचकांच्या सोयीसाठी जोडल्या आहेत.. District Judge Badlya 2026 CJSD Judge Badlya 2026 JMFC Judge Badlya 2026 Kanthak Suryatal Post Views: 1,042 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खा. इकरा हसन म्हणाल्या मला गोळी मारा शिक्षक पदाच्या बनावट नियुक्तीत १ लाख ९० हजारांची फसवणूक; तर बँक नोकरीच्या आमिषाने ५.५ लाखांचा गंडा