लिंबगाव (प्रतिनिधी)- पिंपरी महिपाल येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली आणी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले. त्या मधे लेझीम पथकाने अती उत्कृष्ट कला गुण सादर केले. त्या मुलांच्या लेझीम पथकाच्या कला गुणांवर प्रभावित होऊन लिंबगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद, पोलीस पोलीस अंमलदार निवृत्ती रामनबईनवाड, बीट जमादार, रितेश टाक, गोपनीय शाखेचे अंमलदार देशमुख यांच्या हस्ते मुलांना विविध प्रकारचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्या मध्ये वही, पेन बक्षीस देऊन शालेय मुलांचा व मुलींचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. मंडळा तर्फे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा यथोचित्त सत्कार करण्यात आला व जयंती उत्साहात व शांततेत पार पडली.
More Related Articles
कुंटूर येथे घरफोडी; १ लाख ५२ हजार ५६० रुपयांचा ऐवज लंपास
कुंटूर (प्रतिनिधी)- गावातील एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५२ हजार ५६० रुपयांचा ऐवज…
14 वर्ष 11 महिन्याच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारे दोघे गजाआड
नांदेड(प्रतिनिधी)-14 वर्ष 11 महिन्याच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोन जणांविरुध्द भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.…
पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला
नांदेड,(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात वाचक असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अयुब हिराजी शेख यांच्यावर पन्नास हजार…
