नांदेड – भीम क्रांती महिला मंडळाच्यावतीने पंचशिल बुद्ध विहार विश्वनाथ नगर (हनुमान गड स्थीत) नांदेड येथे दि.7 फेब्रुवारी 2026 शनिवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता त्यागमूर्ती, महासुर्याची सावली, महामानवाच्या उर्जा स्त्रोत, कारूण्यमुर्ती, माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर पाईकराव यांया हस्ते त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर लगेचच त्रिशरण पंचशिल बुद्ध धम्म वंदना सामुहिकरित्या घेण्यात आली. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, मुरलीधर पाईकराव, केशव शितळे, बबनराव पाईकराव, प्रितम ढगे, भिमक्रांती महिला मंडळाच्या सर्व उपासिका, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विश्वनाथ नगर मधील सर्व समाज बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 665 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मौजे पिंपरी महिपाल येथे रमाई जयंती उत्साहात साजरी खून करणारा मारेकरी 12 तासात एलसीबीने पकडला