पत्रकार संजीव तुकाराम कुलकर्णी यांना नांदेड क्लब निवडणुकीत मिळाले 417 मतदानापैकी फक्त 17 मतदान

नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी यांना नांदेड क्लब निवडणुकीत फक्त 17 मते मिळाली आहेत. एकूण 417 मतदारांपैकी 17 मते म्हणजे 4.07 टक्के मतदान मिळवून पत्रकार संजीव तुकाराम कुलकर्णी यांनी आपला प्रभाव पाडला आहे.
नांदेड क्लबची त्रैवार्षिक कार्यकारणी निवडणुक 2025 पार पडली. त्यामध्ये अजीवन सदस्य प्रवर्ग आणि सर्वसाधारण वार्षिक प्रवर्ग अशा दोन वेगवेगळ्या विभागात हे मतदान श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियम परिसरातील टेबल टेनिस हॉलमध्ये 10 नोव्हेंबर रोजी झाले. या निवडणुकीचे निर्णय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ हे होते. अजीवन सदस्य प्रवर्गात एकूण 33 उमेदवार होते. ज्यामध्ये सर्वात शेवटी 33 व्या क्रमांकावर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव तुकाराम कुलकर्णी यांचे नाव आहे. एकूण 33 उमेदवारांंमध्ये दहा उमेदवारांना मतांची तीन आकडी संख्या गाठता आली नाही. त्यात संजीव कुलकर्णी यांचा नंबर सर्वात शेवटी आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रात गाजलेली मराठी पत्रकार परिषद आहे. त्यात संजीव कुलकर्णी यांनी अनेक झेंडे गाडले. पण नांदेड शहरात 417 मतदारांमध्ये फक्त 17 मतदान मिळवता आले. काय दाखवते ही मतांची संख्या ते वाचकांनी ठरवावे.
नांदेड क्लबच्या 417 सदस्यांमध्ये सर्वाधिक मतदान सतिश पुरूषोत्तम माहेश्र्वरी यांना मिळाले आहे. त्यांना 270 मतदान आहेत. 2002 च्या पुर्वी यांनीही सुध्दा महानगरपालिकेची निवडणुक लढवली होती. पण त्यावेळेस विजय मात्र झाले नव्हते. नंतर महाराष्ट्र शासन, महानगरपालिका यांनी सतिश माहेश्र्वरीला सर्व बांधकामांचे गुत्ते देवून त्यांच्या सात पिढ्यांचे भले करण्याचा चंगच बांधलेला आहे.
या नांदेड क्लब निवडणुकीत सर्वसाधारण वार्षिक प्रवर्गात डॉ.राहुल राजेंद्र महाजन यांना सर्वाधिक 248 मते मिळाली आहेत. या गटातून कार्यकारणीसाठी चार सदस्य द्यायचे असतात आणि आजीवन सदस्य प्रवर्गातून 11 सर्वाधिक मतदान घेणारे सदस्य कार्यकारणीत जात असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!