नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या प्रभाग निहाय आरक्षणामध्ये 41 महिला यांच्या नावे आरक्षण झाले आहे. म्हणजे जवळपास 50 टक्के आरक्षण महिलांसाठी आहे. आज महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये 41 महिला आहेत आणि 20 प्रभागांपैकी ड या विभागात 20 मध्ये 18 जागा सर्वसाधारण आहेत. प्रभागनिहाय आरक्षणाचा तक्ता जेपीसीमध्ये जोडला आहे. Oplus_16908288 जनगणना 2011 प्रमाणे नांदेड शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 40 हजार 439 आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 2 हजार 677 आहे. अनुसूचि जमातीची लोकसंख्या 12 हजार 738 आहे. या प्रभाग निहाय निवडणुकीमध्ये 1 त े 19 हे प्रभाग चार सदस्यीय असतील तर 20 क्रमांकाचा प्रभाग हा 5 सदस्यीय असेल. निवडूण येणाऱ्या 81 सदस्यांमध्ये महिला 41 आहेत. अनुसूचित जाती एकूण 15 त्या महिला 8 आहेत. अनुसूचित जमाती एकूण 2 त्यात महिला 1. नागरीकांचा मागास प्रवर्ग एकूण संख्या 21 त्यामध्ये महिलांची संख्या 11 आहे. सर्वसाधारण या प्रभागांमध्ये एकूण 43 सदस्य निवडूण येतील. त्यात 21 महिला आहेत. 4 जागा असलेल्या प्रभागांमध्ये महिलांसाठी 2 जागा राखीव आहेत. Kanthak Suryatal Post Views: 741 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘भारतीय राजकारणातील भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी’ पुस्तकाचे प्रकाशन पत्रकार संजीव तुकाराम कुलकर्णी यांना नांदेड क्लब निवडणुकीत मिळाले 417 मतदानापैकी फक्त 17 मतदान