नांदेड :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच वेळी देशासाठी मध्यस्थी हे अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड येथे 1 जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गं. वेदपाठक यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ झाला आहे.
या अभियानांतर्गत दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहकमंच मध्ये दाखल असलेली जास्तीत जास्त प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठविण्यात यावी. हे अभियान 30 सप्टेंबर 2025 पर्यत चालणार असून, आठवडयातील सात दिवस प्रशिक्षित मध्यस्थ प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तरी जास्तीत जास्त पक्षकारानी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी केले आहे.