नांदेड(प्रतिनिधी)-सलग 6 वर्षापेक्षा जास्त अर्धापूर पोलीस ठाणे, येथून बदली, येथून कार्यमुक्त होण्यासाठी जवळपास वर्ष आणि कार्यमुक्त होताच काही दिवसात पुन्हा अर्धापूरला नियुक्ती आणि अर्धापूर येथील गुन्हे विभागात कार्यरत असणाऱ्या पोलीस अंमलदार अश्र्विनी गोडबोले बकल नंबर 2954 यांच्याबद्दल नांदेड येथील गुरूद्वारा सुरक्षा विभागात तेथील पोलीस निरिक्षक भुजंग गोडबोले यांनी अश्र्विनी गोडबोले यांच्याबाबत केलेली नोंद अत्यंत उध्दट व बेशिस्त वर्तन आणि महिला असल्याचा फायदा अशा स्वरुपाची आहे. यावर मात्र पोलीस अधिक्षकांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. नाही तर डायरीमध्ये अशी नोंद आली तर त्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही किंवा पोलीस अधिक्षकांना योग्य वाटेल तरी कार्यवाही केली जात असते. पण याच प्रकरणात असे का घडले नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण याच नोंदीमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकीर याने व्हाटसऍप कॉल करून शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचे सुध्दा नमुद आहे. म्हणजे पोलीस अधिक्षकांना शेख जाकीरचा हस्तक्षेप आवडतो काय? म्हणूनच असे घडले आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
पोलीस अंमलदार अश्र्विनी गोडबोले बकल नंबर 2954 यांच्या संदर्भाने ही नोेंद गुरुद्वारा सुरक्षा पथकाचे पोलीस निरिक्षक भुजंग गोडबोले यांनी 14.20 वाजता लिहिले आहे की, अश्र्विनी गोडबोले त्यांच्या कक्षात आल्या आणि शुक्रवार दिवसाचीच साप्ताहिक सुट्टी पाहिजे म्हणून वाद घालत होत्या. त्यांना सांगण्यात आले की, मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसा पोलीस मुख्यालयात साप्ताहिक परेड असते. तसेच गुरुद्वारा संरक्षण पथकातील काही पोलीस अंमलदार शुक्रवारी सुट्टीवर असतात. म्हणून गुरुवार, बुधवार अशी कोणत्याही दिवसाची साप्ताहिक सुट्टी घेणे बाबत त्यांना समज दिली. तेंव्हा त्या मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून हात वारे करून, बोट दाखवून उध्दटपणे वाद घालत होत्या. या प्रसंगी दोन महिला पोलीस अंमलदार तेथे उपस्थित होत्या. असेही या नोंदमध्ये लिहिले त्यांच्या बकलनंबरसह लिहिलेले आहे.
यापुढे पोलीस निरिक्षक गोडबोले नमुद करतात अश्र्विनी गोडबोले यांचे अगोदरही बेशिस्त व उध्दट वर्तन असल्याचे दिसून येते. अर्धापूर पोलीस ठाणे ते गुरुद्वारा संरक्षण पथक कार्यालय अशी त्यांची बदली झाली होती. त्यावेळी त्या रात्री उशीरा हजर होण्यासाठी आल्या. रात्रपाळीच्या कामामध्ये कोणीही महिला पोलीस अंमलदार उपस्थित नसल्याने उद्या सकाळी कार्यालयात येण्याची सुचना केली असता पोलीस अंमलदार घुगे यांच्यासोबत वाद घालत तसेच लेखी लिहुन दे बाबत उध्दट वर्तन केले. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकीर यांच्या व्हाटसऍप कॉलद्वारे हजर करून घेणे बाबत खाजगी इसमाचा शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचे दिसून येते.
पोलीस अंमलदार 2954 गोडबोले या पोलीस ठाणे अर्धापूर येथील पोलीस निरिक्षक कदम यांचेही ऐकत नसल्याचे व ते ही भिऊन काहीही बोलत नसल्याचे सांगत होत्या. तसेच आता आयजी सरांना कॉल करते असे त्यांनी पोलीस अंमलदार घुगे आणि महिला पोलीस अंमलदाराला सांगून व्हाटसऍप कॉल करून भिती घालत होत्या. एकूणच अतिशय उध्दट व बेशिस्त वर्तन व त्या महिला असल्याचा फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे अशी ही एकूण नोंद आहे.
अशीच एखादी नोंद नांदेड जिल्ह्यातील 36 पोलीस ठाणे, वेगवेगळे विभाग यांच्या डायरीत असली असती तर पोलीस अधिक्षक कार्यालयाने नक्कीच त्यावर त्वरीत कार्यवाही केली असती. काही दिवसांपुर्वीच एका पोलीस अंमलदाराला त्याच्या फोनवरुन आरोपीला त्याच्या नातलगांशी व्हिडीओ कॉल करू दिला म्हणून निलंबित करण्यात आले आहे. पण या नोंदीप्रमाणे शेख जाकीर हा खाजगी इसमच आहे. तरी पण तो व्हाटसऍप कॉल करून पोलीसांच्या कामात दखल देतो. याही बाबीला नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी गांभीर्याने घेतलेले नाही हा भाग खरेच विचारणीय आहे.
गुरुद्वारा संरक्षण पथकातील नोंदीमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकीरचा उल्लेख
