नांदेड(प्रतिनिधी)-कोलंबी ता.नायगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बालाजी नारायण आचमे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जूनच्या रात्री 10 ते 28 जूनच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेदरम्यान त्यांच्या सासुरवाडीचे घर कोलंबी येथील घराचा कडी कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले 27 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिणे 1 लाख 24 हजार 800 रुपयांचे चोरून नेले आहेत. नायगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 142/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,025 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्रकार येणार नाहीत म्हणून शिक्षक परिषदेच्या सदस्यांना बोलावून पत्रकारांचा कार्यक्रम संतोष पांडागळे घडवितात गुरुद्वारा संरक्षण पथकातील नोंदीमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकीरचा उल्लेख