नांदेड (प्रतिनिधी)- शाळेत शिकणारी लहान लहान मुलं म्हणजे एका सुंदरशा बागेतली गोजिरवाणी रंगीबेरंगी फुलं असतात. त्यांना स्वच्छंद बागडण्याचा उडण्याचा खेळण्याचा निसर्गान सर्वाधिकार दिलेला आहे. हीच मुलं हीच फुलं उद्याच्या उज्वल भारताच्या भविष्याची चाहूल आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्रथम प्राधान्य देत आपल्यातील कलागुणांना वाव दिला पाहिजे. केवळ डॉक्टर आणि इंजीनियरिंग अभ्यासक्रमाची ओढ ठेवण्यापेक्षा तुमच्यासमोर उभ्या असलेल्या विविध क्षेत्रातल्या स्वर्णिम संधीचा वेध घेण्यासाठी सरसावले पाहिजे, असे प्रतिपादन श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, जेष्ठ पत्रकार, नांदेड मधील प्रसिद्ध उद्योजक आणि अभ्यासक डॉ. देवदत्त देशपांडे यांनी केले. नांदेडच्या महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंचशील विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती पंचफुलाबाई माणिकराव लोणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यक्रमाला श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त शाहीर रमेश गिरी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. बाळासाहेब उर्फ संदीप माणिकराव लोणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. यु. वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकात पंचशील शाळेच्या इतिहासाचा मागोवा घेतला. विजयनगर भागातील मंगल कार्यालयात झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात पंचशील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी डॉ. विकास कदम यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. शाहीर रमेश गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांपुढील कलाक्षेत्राचे विविध पैलू उजाकर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती पंचफुलाबाई माणिकराव लोणे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पंचशील विद्यालयाचे सहशिक्षक बी. टी. सावंत सर यांनी केले. पंचशील विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सौ. पाटील एस. डब्ल्यू, शिंदे एस. पी. व्यवहारे ए. जी., अक्कमवाड जी. बी., सौ. वदुलवाड एस. डी. गोडबोले एस. एम., श्रीमती लोणे एस. के., लोणे एस. एम. आदी सहशिक्षक, शिक्षिका यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थी-पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. Kanthak Suryatal Post Views: 743 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लिटिल स्टार पब्लिक (प्रि प्रायमरी) स्कुलचे स्नेह संमेलन संपन्न माता रमाईचा आदर्श समोर ठेवून महिलांनी आपली मुले घडवावीत – कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम