नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दुसऱ्या दिवशीही जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण सुमारे 16 लाख 52 हजार 975 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रात अवैध दारू, जुगार, मटका आदी धंद्यांवर लक्ष केंद्रित करून ही मोहीम राबवण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी विविध ठिकाणी छापे टाकून 7 आरोपींकडून 1,36,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 12 गुन्हे दाखल करून आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासोबतच अंमली पदार्थ विरोधातही कारवाई करण्यात आली असून, संबंधित कायद्यांनुसार गुन्हे नोंदवले गेले आहेत. या सर्व कारवायांमुळे परिसरातील अवैध व्यवसायांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारेही पोलिसांनी कारवाई अधिक प्रभावी केली आहे. ‘खबर’ नावाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे गुन्हे उघडकीस आणण्यास मोठी मदत होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात सुरू असलेल्या कोणत्याही अवैध प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, जेणेकरून अशा गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.खबर हेल्प लाईन वर जनता माहिती देत असल्याने डीआयजीच्या कामात तीव्रता आलेली आहे. Kanthak Suryatal Post Views: 608 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोवंश हत्या न करण्यासाठी मुस्लिम समाज सार्वजनिक जनजागृती करत आहे नांदेड येथे शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक सरदार चरणसिंघ संधू यांचे निधन