नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक सरदार चरणसिंघ सोहनसिंघ संधू (वय 70 वर्षे) यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नांदेड शहरातील शीख समाजात शोककळा पसरली आहे. आज सकाळी सुमारे 10.00 वाजता गुरुद्वारा हजुर साहिब येथे पारंपरिक धार्मिक विधीनुसार त्यांच्या साठी आशीर्वाद मागण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अंतिम दर्शन घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अंत्ययात्रा नगिना घाट स्मशानभूमीकडे काढण्यात आली. तेथे शीख धर्मपरंपरेनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या सुपुत्र परविंदरसिंघ उर्फ पित्ता संधू यांनी मुखाग्नी दिला. या प्रसंगी नांदेड शहरातील शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक, मित्र तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरदार चरणसिंघ हे समाजकार्य व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी ओळखले जात होते. Kanthak Suryatal Post Views: 1,171 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दुसऱ्या दिवशी 16.53 लाखांचा मुद्देमाल जप्त;12 गुन्हे दाखल नांदेडच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू; मानवतजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ