नांदेड(प्रतिनिधी)-फेबु्रवारी महिन्यात एका महिलेला फोन करून 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या व्यक्तीविरुध्द आता तक्रार आल्यानंतर जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत राहणाऱ्या एका 22 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 1 फेबु्रवारी 2025 रोजी दुपारी सय्यद शोयब (23) या युवकाने त्यांना फोन करून 25 लाख रुपयांची मागणी केली. सुरूवातीला थांबले असतांना त्या युवकाने महिलेला पुन्हा वारंवार फोन करून तुझी बदनामी करतो अशा धमक्या दिल्या. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमंाक 251/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक सुनिल बुलंगे हे अधिक तपास करीत आहेत.
22 वर्षीय महिलेला 25 लाखांची खंडणीची मागणी
