नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस ठाणे इतवारा येथील गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 85 हजार 406 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दि.4 ऑक्टोबर रोजी इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक गस्त करत असतांना पोलीस ठाणे देगलूर आणि रामतिर्थ यांच्या हद्दीत चोऱ्या करणारे गुन्हेगार त्यांच्याकडील चोरीचे साहित्य विकण्यासाठी भंगार व्यवसायीकांकडे आले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची नावे शेख अजीज उर्फ मौलाना शेख मुस्तफा (42) मुळ रा.खडकपुरा पण सध्या मुक्काम हैद्राबाद तेलंगणा तसेच शेख आरेफ शेख बाबु (30) हा भंगार दुकानदार असून तो देगलूर नाका येथे राहतो असे त्यांचे वर्णन आहे. रामतिर्थ पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 243/2024 मध्ये त्यांनी चोरलेली लोखंडी गजाळी किंमत 50 हजार रुपयांची आणि देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा क्रमांक 441/2024 मधील बॅटऱ्या व चार्जिंग साहित्य असा एकूण 85 हजार 406 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी त्यांना देगलूर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे आदींनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार देविदास बिसाडे, मिर्झा अख्तर बेग, मोहन हाके, धीरज कोमुलवार, हबीब चाऊस, लक्ष्मण दासरवाड, शेख जावेद, रेवननाथ कोळनुरे, नजरेआलम देशमुख, संघरत्न गायकवाड आदींचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 803 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अहमदनगरचे नाव आता झाले अहिल्यानगर जलजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न