नांदेड(प्रतिनिधी)-लोहा रस्त्यावर उभ्या असलेल्या एका गाडीतून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि 35 हजार रुपये रोख रक्कम असा 65 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
विकास रामभाऊ थोरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 फेबु्रवारी रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास लोहा-कंधार जाणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या गाडीत ठेवलेले दोन मोबाईल 30 हजार रुपये किंमतीचे आणि 30 हजार रुपये रोख रक्कम असा 65 हजार रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 38/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
लोहा-कंधार रस्त्यावर चार चाकी गाडीतून दोन मोबाईल आणि रोख रक्कम चोरली
