नांदेड(प्रतिनिधी)-अनैतिक संबंधांच्या कारणातून एका 38 वर्षीय व्यक्तीचा खून त्रिकुट शिवारातील गोदावरी नदीच्या काठावर करण्यातत आला आहे. मारेकऱ्यांपैकी एकाला बारड पोलीसांनी अटक केली आहे. जगमिरसिंघ उर्फ तेजुसिंघ चाहेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या पहाटे 9 वाजेदरम्यान हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी कुलवंतसिंघ चाहेल आणि त्याच्यासोबत ईश्र्वरसिंघ जयवंतसिंघ गिरणीवाले रा.चिखलवाडी आणि त्यांच्या साथीदारांनी तेजपालसिंघ उर्फ तेजुसिंघ उर्फ तेजा बांगा कुलवंतसिंघ चाहेल (38) रा.कौठा नांदेड यास त्रिकुट शिवारातील गोदावरी नदीच्या काठावर काठीने, बेल्टने, डोक्यात व संपुर्ण शरिरावर मारहाण करून त्याचा खून केला आहे. एफआयआरमध्ये लिहिल्याप्रमाणे मयत तेजपालसिंघचे हरप्रितसिंघ चाहेल यंाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते असे लिहिले आहे. बारड पोलीसांनी हे खून प्रकरण भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 107/2024 नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास बारडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष केदासे हे करीत आहेत. बारड पोलीसांनी एफआयआरमधील नावांपैकी ईश्र्वरसिंघ जयवंतसिंघ गिरणीवाले यास अटक केली आहे. न्यायालयाने ईश्र्वरसिंघ गिरणीवालेला —- दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,090 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation Semaglutide Kopen bij Kruidvat: Effectieve Diabetesbehandeling महिलेची 1 लाख 60 हजारांना ऑनलाईन फसवणूक