नांदेड(प्रतिनिधी) -बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे 4 लाख 36 हजार 500 रुपयांच्या किंमतीचे दागिणे ठेवलेला प्लॅस्टीकचा डबा चोरीला गेल्याची घटना देगलूर ते मरखेल प्रवासादरम्यान घडली आहे. मरखेल येथील महिला सौ.वैशाली राहुल रावसाहेब या 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.45 वाजता देगलूर येथून मरखेल जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करीत असतांना दुपारी 3.15 वाजेच्यासुमारास त्यांच्या लक्षात आले की, आपल्या जवळच्या बॅगमध्ये ठेवलेला प्लॅस्टीकचा डबा गायब आहे. त्यामध्ये 4 लाख 36 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे होते. मरखेल पोलीसांनी हा चोरीचा प्रकार गुन्हा क्रमांक 247/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक वळसे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 966 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खून झालेल्या अनोळखी व्यक्तीबद्दल कोणास माहिती असेल तर संपर्क साधा-सहाय्यक पोलीस निरिक्षक जगताप विहिरत पडून मरण पावलेला व्यक्ती गोदावरी जिवरक्षक दलाने बाहेर काढला