नांदेड – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा शासकीय कंत्राटदार नरेश पैंजणे (५३) यांचे शनिवारी सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दि.१ सप्टेंवर रोजी सकाळी १० वा. गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर कस्तुरी निवास, यशवंतनगर विस्तारीत येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचे ते पती होत. नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले आहे.
More Related Articles

लिट्ल स्कॉलर्स पब्लिक स्कुलचे शिक्षक लालू यंगुलवार यांचे निधन
नांदेडः अनिकेतनगर येथील लिट्ल स्कॉलर्स पब्लिक स्कुलचे शिक्षक लालू यंगुलवार यांचा नांदेड रेल्वेस्थानकावर रेल्वेखाली पडून…

शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक
नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय दस्तावेजांवर आता आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या महिला…

जिल्हा आरोग्य अधिकारी गेल्या साखर कारखानाच्या पाला वर
अर्धापूर :- नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी साखर कारखाने, ऊसतोड कामगार व वीट भट्टी कार्यक्षेत्रा अंतर्गत…