नांदेड – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा शासकीय कंत्राटदार नरेश पैंजणे (५३) यांचे शनिवारी सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दि.१ सप्टेंवर रोजी सकाळी १० वा. गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर कस्तुरी निवास, यशवंतनगर विस्तारीत येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचे ते पती होत. नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,718 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अडियल किड्स पब्लिक स्कुलमध्ये गोकुळ आष्टमी साजरी आता मनासारखे मनसोक्त जगा-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार