ऍड.प्रकाश आंबेडकरांनी प्रथम भारिप बहुजन महासंघ हा राजकीय पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांचे नामकरण बदलून वंचित बहुजन आघाडी असे केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात जवळपास 1 कोटी मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मुख्य आधार असलेल्या बौध्द समाजाने तन आणि मन या दोन्ही पध्दतीने भरपूर काम केले. परंतू यश आले नाही हा वेगळा विषय आहे. त्यासाठी राज्य कार्यकारणीने घेतलेले निर्णय सुध्दा कारणीभुत आहेत.
राज्य कार्यकारणीमध्ये काम करणाऱ्या काही निवडक लोकांनाच्या सांगण्यावरून वंचित बहुजन आघाडीचा सर्व कारभार चालतो असा समज आता बौध्द समाजात पसरत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीवर मराठवाड्यातून एकही बौध्द प्रतिनिधी नाही ही बाब आता समाजाला खटकायला लागली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 48 जागा राखीव आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव होती ती लातूर मतदार संघाची त्या निवडणुकीत एकही बौध्द उमेदवार दिलेला नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती मतदार संघातून शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे विरुध्द वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला नाही. त्यानंतर मुंबई येथील निवडुण आलेल्या खासदार वर्षा गायकवाड यांनी असे बोलून दाखवले होते की, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुप्रिया सुळेला मदत केली त्याप्रमाणे मला सुध्दा मदत करायला हवी होती. पण तसे घडले नाही. याबद्दलही समाजात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
नांदेड येथील आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांचे वडील सुनिल मोरे हे भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष होते. त्यानंतर प्रतिक मोरे यांनी सुध्दा भारिप बहुजन महासंघात काम केले. आज ते वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहेत. त्यांना कोणतेही पद कधी मिळाले नाही. आता त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टनुसार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशिल सभासद पदाचा राजीनामा देण्याची माझी मानसिकता झाली आहे. तरीपण चळवळीतील मार्गदर्शक, सहकारी मित्र व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून 15 ऑगस्टला निर्णय जाहीर करेल असा उल्लेख त्या पोस्टमध्ये आहे. नांदेड येथील प्रा.राजू सोनसळे यांनी सुध्दा सन 2019, 2024 या लोकसभा निवडणुकांमध्ये व विधानसभा निवडणुकांमध्ये भरपूर काम केले. त्यांच्या मानसिकतेनुसार सुध्दा आपल्या घरूनच आपल्याला बाहेरच्या सारखे वागवले जात असेल तर मला सुध्दा पुढे निर्णय घ्यावा लागेल असे त्यांचे मत झाले आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी जिवाचे रान करणाऱ्या बौध्द समाजातील कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यकारणीमध्ये स्थान नाहीच नाही.सोबतच येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये समाजातील व्यक्ती उमेदवार या शर्यतीत पण नसल्याचे त्यांना दु:ख वाटते.
आज प्रतिक मोरे आणि प्रा.राजू सोनसळे यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षातून राजीनामा दिला नसला तरी त्याबाबतची चर्चा नांदेड जिल्ह्यात भरपूर झाली आहे. त्यांनी राजीनामा दिला तर बौध्द समाजातील इतरही युवक मंडळी वंचित बहुजन आघाडीच्या बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या संदर्भाने प्रा.राजू सोनसळे यांच्याशी वास्तव न्युज लाईव्हने संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, नांदेड लोकसभेला वंचितच्या उमेदवाराच्या सगळ्यात जास्त सभा स्वत:च्या खिशातून पैसे टाकून मी घेतल्या पंरतू पक्ष नांदेड उत्तर अथवा दक्षीण मतदारसंघातून उमेदवारी देण्यास तयार नाही. मग वंचितमध्ये बौध्दांनी सतरंज्याच उचलायच्या का?
2024 नांदेड लोकसभेत विसावा हॉटेलात महिनाभर विसावा घेणाऱ्यांना पक्षाच्या राज्य कार्यकारणीने नांदेड दक्षीण व कंधार-लोहा येथील उमेदवारीवर शिक्का मोर्तब केलेला आहे. हे दुर्देवी असल्याची प्रक्रिक्रिया त्यांनी यावेळी दिली.