नांदेड – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांनी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १७, १८, १९ व २० एप्रिल २०२६ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट (पिवळा इशारा) जारी केला आहे. पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज १७ एप्रिल : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट येण्याची शक्यता. १८ एप्रिल : तुरळक ठिकाणी उष्मालाट; तसेच दुपारनंतर/संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह गडगडाटी वातावरणात हलका ते मध्यम पाऊस. १९ व २० एप्रिल : तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह गडगडाट आणि हलका ते मध्यम पाऊस. उष्मालाट काळात नागरिकांनी काय काळजी घ्यावी? हे करा : · भरपूर पाणी प्या (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार), ओआरएस, ताक, लिंबूपाणी, नारळ पाणी, लस्सी किंवा भाताची पेज घ्या. · हलके, सैलसर सुती कपडे वापरा, डोके झाकून ठेवा, छत्री किंवा टोपी वापरा. · डोळ्यांसाठी गॉगल व त्वचेसाठी सनस्क्रीन वापरा. · ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्या. हे टाळा : · दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे व श्रमाची कामे टाळा. · अनवाणी चालू नका. · अल्कोहोल, चहा, कॉफी, शीतपेये, तिखट, तेलकट, जास्त मीठाचे व उच्च प्रथिनयुक्त अन्न टाळा. · शिळे अन्न टाळा. · चारचाकी वाहनात मुले किंवा प्राणी ठेवू नका. · पेट्रोलचे दिवे किंवा बत्ती लावू नका यामुळे अनावश्यक उष्णता निर्माण होते. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, नांदेड यांनी केले आहे. संपर्क : जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र – (०२४६२) २३५०७७, टोल फ्री – १०७७ Kanthak Suryatal Post Views: 934 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जस्टिस अँड ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी लाईनमनच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे हाल; स्वखर्चातून घेतलेला डीपीही अर्धवट